सरकारबरोबर पटत नसले तरी तीन वर्षे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे नाक घासत सत्तेतच आहेत. आता ते नाकही राहिलेले नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आज लगावला.
कोल्हापूर जिल्ह्यात आता शिवसेनेचे सहा आमदार असले तरी पुढच्या वेळी ही संख्या "झिरो' असेल, याचा अर्थ आता असलेल्या आमदारांचा पराभव करणार नाही, तर तेच स्वतःचा पर्याय शोधतील, असे श्री. राणे म्हणाले. "स्वाभिमान'च्या स्थापनेनंतर राज्यभर दौऱ्यासाठी बाहेर पडलेल्या श्री. राणे यांची आज पहिली सभा कोल्हापुरात झाली. तत्पूर्वी, शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews